जानवे वनक्षेत्रातील खुनाचा छडा उलगडला! – अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी..

0

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत २३ जुलै रोजी नोंदविण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू क्रमांक ५९/२०२५ चा छडा उलगडत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे जानवे वनक्षेत्रातील मिळालेल्या मानवी अवशेषांवरून व तांत्रिक तपासाच्या आधारे हा खुन असल्याचे निष्पन्न झाले. पारोळा पोलीस स्टेशन हद्दीतील सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदानशिव याने हा खुन केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

मृतकाचे नाव वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर, कतारगाम दरवाजा, सुरत, गुजरात) असे आहे. तिच्या मोबाईल क्रमांक ९९७८२३६७०१ व आरोपीच्या मोबाईल क्रमांक ९१४६७६९८११ यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डच्या तपासात २ मे ते ५ मे २०२५ दरम्यान वारंवार संपर्क झाल्याचे आढळले.

आरोपीने मृत वैजंताबेन यांना काही अमिष दाखवून जानवे वनक्षेत्रात नेऊन तिची हत्या केली, असे तांत्रिक, मौखिक व घटनास्थळावरील पुराव्यावरून निष्पन्न झाले आहे.

२५ जुलै रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुन्हा रजि. क्र.३०४/२०२५ दाखल करण्यात आला आहे. मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर व अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोनि संदिप पाटील (नेम-स्थागुशा)
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, समाधान गायकवाड, नामदेव बोरकर
पोलीस हवालदार कैलास शिंदे, काशिनाथ पाटील व सागर साळुंखे

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!