अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ, बोदरडे गावांमध्ये लंपी लसीकरण मोहीम यशस्वी; 1000 जनावरांचे लसीकरण पूर्ण..

0


आबिद शेख/अमळनेर


अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ आणि बोदरडे या गावांमध्ये गुरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत एकूण 1000 जनावरांचे (650 मुडी व मांडळ येथे, तर 350 मुडी व बोदरडे येथे) लंपी लसीकरण करण्यात आले.

ही संपूर्ण मोहीम जळगाव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. भुसावळ येथील फिरते पशुवैद्यकीय पथकातील डॉ. पवन सरोदे, डॉ. प्रशांत कोळं व चालक फकीरा तडवी तसेच अमळनेर येथील डॉ. दीपक पाटील यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. संदेश वाटोळे, यशोदीप पाटील व बोरसे यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली.

याशिवाय या लसीकरण मोहिमेसाठी मांडळ गावाचे सरपंच मा. दीपकजी बडगुजर, माजी सरपंच विजय पाटील व नथू पाटील, अनिल जैन, विनायक बडगुजर, आर. डी. कोळी, राजेंद्र धनगर, रवींद्र मोरे तसेच मुडी गावाचे सरपंच मदाबाई पाटील यांचे सुपुत्र महेंद्र पाटील, संजय पाटील, भाऊसाहेब सोनवणे, पंढरीनाथ पाटील, हेमंत पाटील, किशोर पाटील, राजेंद्र वानखेडे, काशिनाथ माळी, तुषार सूर्यवंशी, गुलाब पाटील, डॉ. मनोहर चित्ते, डॉ. भटू सनंदनशिव, डॉ. भूषण जोशी यांनी आपले सहकार्य दिले.

या मोहिमेदरम्यान केवळ लसीकरण नव्हे, तर काही बाधित जनावरांवर उपचारही करण्यात आले. गावकऱ्यांनी आणि स्थानिक नेतृत्वाने एकत्र येत केलेले सहकार्य ही यशस्वी लसीकरणाची मुख्य कारणे ठरली.

पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांमुळे लंपी आजार रोखण्यास मदत; जनावरांचे आरोग्य सुनिश्चित


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!