प्रा. रविंद्र माळी यांना ‘राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार’

आबिद शेख/अमळनेर

– खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम (भारत सरकार)तर्फे २७ जुलै रोजी नंदूरबार येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. माळी हे गेली २७ वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी संशोधन, शोधनिबंध लेखनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत त्यांची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर आणि प्राण्यांवरील प्रयोगांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रीय समितीतही करण्यात आली आहे.
या सन्मानानंतर प्रा. माळी यांचे संस्थेतील पदाधिकारी, विद्यार्थी, सहकारी आणि विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट