बँक बॅलन्स तपासण्यावर मर्यादा !१ ऑगस्टपासून लागू होणार यूपीआयचे नवे नियम.

0

24 प्राईम न्यूज 31 Jul 2025


आजच्या डिजिटल युगात गुगल पे, फोन पे, पेटीएमसारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यूपीआय व्यवहार होत आहेत. मात्र आता या व्यवहारांवर काही नव्या मर्यादा येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) संदर्भात काही नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व नियम १ ऑगस्ट २०२५ पासून देशभर लागू होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, यूपीआयद्वारे व्यवहार करताना वापरकर्त्याला आता प्राप्तकर्त्याच्या बँकेचे नावही दिसणार आहे. यामुळे चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याचा धोका कमी होईल. तसेच, प्रत्येक व्यवहारानंतर लगेचच खात्यातील उर्वरित रक्कमही दिसणार आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढणार आहे.

महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे :

🔹 बँक बॅलन्स तपासण्यावर मर्यादा:
वापरकर्ते दिवसातून अनेकदा बॅलन्स तपासतात. आता दिवसातून फक्त ३ वेळा बॅलन्स तपासता येणार आहे. शिवाय, दोन चेकमध्ये ९० सेकंदांचे अंतर आवश्यक आहे.

🔹 ट्रान्सॅक्शन स्टेटस तपासण्यावर मर्यादा:
दिवसातून फक्त ३ वेळा पेमेंटचे स्टेटस तपासता येणार आहे.

🔹 ट्रान्सॅक्शन हिस्ट्रीवर मर्यादा:
मोबाईल नंबरने लिंक असलेल्या बँक अकाऊंटसाठी दिवसातून फक्त २५ वेळा ट्रान्सॅक्शन हिस्ट्री पाहता येणार आहे.

🔹 मर्यादेपेक्षा जास्त वापर झाल्यास दंड:
वरील मर्यादा ओलांडल्यास वापरकर्त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, या नव्या नियमांमुळे यूपीआय प्रणालीवरील तांत्रिक ताण कमी होईल आणि व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होतील. त्यामुळे वापरकर्त्यांनी १ ऑगस्टपासून या नव्या नियमांनुसार आपले यूपीआय वापर सवयी बदलून घ्याव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!