“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत मारवड महाविद्यालयात वृक्षारोपण..

आबिद शेख/अमळनेर मारवड (ता. बोधन) | कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात “झाडे लावा आणि झाडे जगवा” या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्हि. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती केली व स्वतःही वृक्षारोपण केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी देखील उपक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केले. त्यांनी सांगितले की, एक पेड माँ के नाम या उपक्रमामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागेल आणि समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचेल.
महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनीही उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. विजय पाटील, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, प्रा. डॉ. दिलीप कदम, प्रा. डॉ. पवन पाटील, श्री. जगदीश साळुंखे, श्रीमती मंजुषा गरूड, डॉ. सचिन पाटील, श्री. शाम पाटील, श्री. दिपक पाटील, श्री. सचिन साळुंखे, श्री. दिलीप चव्हाण यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, पर्यावरणप्रेम आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट