महिलांशी संभाषणाचे धक्कादायक धागे; सिरीअल कीलरच्या तपासासाठी एलसीबीची ३ पथके रवाना.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – सुमठाणे व जानवे शिवारातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या अनिल संदानशिव याने आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती आहे. त्याचे अनेक महिलांशी संपर्क असल्याचे समोर आले असून, एलसीबीने सखोल तपासासाठी तीन पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना केली आहेत.

आरोपी वेगवेगळे जबाब देत पोलिसांची दिशाभूल करत आहे. महिलांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचीही माहिती समोर आली आहे. सुरुवातीला काही महिलांनी त्याला ‘नपुंसक’ म्हणाल्याने रागातून त्यांचे खून केल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून, मृत महिलेचे हाडे व मुलाचे रक्त डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सीडीआर तपासातून धक्कादायक उघड
पोलिसांनी आरोपीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासल्यानंतर, त्याचे अनेक महिलांशी संवाद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महिला जिवंत आहेत की त्याचाही बळी ठरल्या, याचा शोध घेण्यात येत आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याशी चर्चा करून पुढील तपासाची दिशा ठरवली आहे.
या प्रकरणाकडे राज्यासह गुजरात राज्याचेही लक्ष लागले असून, संपूर्ण गुन्हेगारी जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट