एरंडोलमध्ये एस.टी. बस नाल्यात पलटी; १ प्रवाशाचा मृत्यू, ५० जखमी..

24 प्राईम न्यूज 1 Aug 2025

एरंडोल–कासोदा मार्गावर भीषण अपघात झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची MH 20 BL 3402 क्रमांकाची एरंडोल-भडगाव मार्गावरील एस.टी. बस नाल्यात पलटी झाली. या अपघातामुळे एक प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना तत्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

अपघातानंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस, अँब्युलन्स व एस.टी. महामंडळाचे अधिकारी पोहोचले असून, क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर एरंडोल येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट