के. डी. गायकवाड विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर (पैलाड) –
“आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे,” अशी स्फूर्तिदायक गर्जना करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती के. डी. गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली.

युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात सौ. अनिता संदानशिव मॅडम यांनी प्रमुख वक्त्या म्हणून विचार मांडले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रासंगिक असल्याचे सांगत, “पृथ्वी ही शेषनागावर नव्हे तर कष्टकरी, दलित, शेतकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे,” असे प्रभावी विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. एम. आर. सोनवणे सर यांनी भूषवले. त्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी जीवन विद्यार्थ्यांसमोर मांडले.
विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत भाषणांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रभावीपणे मांडून उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जे. एस. पाटील सर यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. डि. एस. पाटील सर यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन श्री. विवेक पाटील सर यांनी केले.
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट