लोकमान्य शिक्षण मंडळाचा 60 वा हीरक महोत्सव उत्साहात साजरा..


आबिद शेख/अमळनेर . कार्यक्रमात संस्थेचा इतिहास, वर्तमान प्रगती आणि भविष्यातील धोरणे याविषयी विद्यार्थ्यांसह पालकांनाही सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. मा. श्री. डी. डी. पाटील सर व चिटणीस मा. श्री. विवेकानंद भांडारकर सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत संस्थेच्या वाटचालीचा मागोवा घेतला.
नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल भोई सर यांनी शाळेच्या भावी योजनांची माहिती सादर केली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन्ही निमित्ताने भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेत राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन उज्वल मार्कंडेय सर यांनी केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट