महसूल दिनी अमळनेरच्या ६ कर्मचाऱ्यांचा गौरव. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर -महसूल दिनाचे औचित्य साधत अमळनेर तालुक्यातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात अमळनेर उपविभागीय अधिकारी नितिन कुमार मुडांवरे यांचे वाहन चालक ताराचंद महारू बाविस्कर यांना उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार देण्यात आला.

तसेच अमळनेर येथील नायब तहसीलदार प्रशांत धमके, उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून अशोक ठाकरे, मंडळ अधिकारी संवर्गातील विठ्ठल पाटील, कोतवाल संवर्गातील मुकेश शिसोदे, आणि नगाव येथील पोलीस पाटील प्रविण गोसावी यांना देखील उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, आमदार राजूमामा भोळे, अमळनेर उपविभागीय अधिकारी नितिन कुमार मुडांवरे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट