कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल उद्योजक राजेंद्र शंकरपुरे यांचा ब्रह्माकुमारिज फरांदे पार्कतर्फे सन्मान..

24 प्राईम न्यूज 2 Aug 2025

नांदेड,
फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने आज कृषी क्षेत्रात विशेष कार्य करणारे उद्योजक राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारिजच्या संचालिका राजयोगिनी आदरणीय बी.के. अनिता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शंकरपुरे यांना ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि पहाड फाऊंडेशन, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार आणि कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व मेडल देऊन शंकरपुरे यांचा सन्मान करताना बी.के. अनिता दिदी यांनी त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य समाजनिर्मितीच्या दिशेने असल्याचे नमूद केले.
यावेळी बोलताना राजेंद्र शंकरपुरे यांनी सांगितले की, “देशी व सुधारित बियाण्यांच्या १०० हून अधिक वाणांवर आम्ही संशोधन करत आहोत. शेतकऱ्यांनी नैसर्गिक व जैविक शेतीतून विषमुक्त उत्पादन घेतल्यास सुदृढ भारताची उभारणी शक्य आहे.”
या कार्यक्रमाला ब्रह्माकुमारिजचे वरिष्ठ भाई, मातृशक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.