अमळनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात अभिवादन व प्रेरणादायी साहित्याचे वितरण..


आबिद शेख/अमळनेर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरातील धुळे रोड येथील त्यांच्या स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या क्रांतिकारी साहित्यसंपदेचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी जिल्हा सदस्या जयश्रीताई पाटील, लेखक हरिश्चंद्र कढरे, प्रा. अशोक पवार, डॉ. विजय तुंटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील, पत्रकार समाधान मैराळे, प्रविण बैसाणे, सुरेश कांबळे, नूर खान, आत्माराम अहिरे, विजय गाढे, अशोक बिऱ्हाडे, अजय भामरे, सुरेंद्र जैन, डॉ. नीरज चव्हाण, आप्पा दाभाडे, चिंधू वानखेडे, जितू कढरे, तात्या वैदू, गोरख साळुंखे, दयाराम पवार, प्रभाकर पारधी तसेच अँड. तिलोत्तमा पाटील, डॉ. राजू कांबळे, प्रवीण शिरसाठ, अनिकेत ब्रम्हे, दिनेश नाईक, तायडे सर, मनोहर पाटील, अभिषेक पाटील, प्रकाश तायडे, विशाल गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या लेखनातून सामाजिक अन्याय, विषमता, आणि श्रमिकांची दुःखद परिस्थिती प्रभावीपणे समोर आली असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. पोवाडे, कादंबऱ्या आणि लोककथांच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती घडवून आणली, हे सर्वांनी एकमुखाने मान्य केले.
या कार्यक्रमात विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बैसाणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. अभ्यासक व साहित्यप्रेमींना प्रेरणादायी विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. उपस्थित सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट