राज्याचे नवें कृषी मंत्री दत्ता भरणे तर कोकाटे क्रीडा मंत्री..

24 प्राईम टाईम 1 Aug 2025

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दोन मंत्र्यांच्या खात्यांमध्ये महत्त्वाची अदलाबदल करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ अन्वये ही सुधारणा करण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेनुसार, श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ या खात्यांऐवजी आता कृषी खाते देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या बदलांमुळे राज्य सरकारच्या कामकाजावर व धोरणांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून संबंधित विभागांतील नवे निर्णय, योजना व अंमलबजावणी याकडे लक्ष वेधले जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट