नांदेड दक्षिणचे आमदार आ. बोढारकर तिडके पाटील यांचा वाढदिवस ब्रह्माकुमारी परिवारात उत्साहात साजरा; राजेंद्र शंकरपुरे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव..

24 प्राईम न्यूज 1 August 2025

नांदेड | प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, वसंत नगर, नांदेड येथे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आ. बोढारकर तिडके पाटील यांचा वाढदिवस ब्रह्माकुमारी परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी समाजसेवक राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे यांना समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार बोढारकर साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास वरिष्ठ ब्रह्माकुमारी स्वाती दिदी, अनिता दिदी, सत्य दिदी, मिना दिदी तसेच वरिष्ठ भाई आणि ब्राह्मण कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सुंदर व प्रेरणादायी कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी आ. बोढारकर यांना शुभेच्छा दिल्या आणि शंकरपुरे यांचे अभिनंदन केले.