कर्तव्यदक्ष सेवेचा सन्मान : जैतपीरचे पोलीस पाटील गोविंदा पाटील यांना पोलीस अधीक्षकांचा हस्ते गौरव.

आबिद शेख/अमळनेर

– अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावाचे पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोलीस पाटील गोविंदा पाटील हे गावातील कुठलीही गोंधळाची किंवा कायद्याचे उल्लंघन करणारी परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून कार्यवाहीस मदत करत असतात. त्यांच्या सतर्क, निःस्वार्थी आणि वेळेवर कार्यामुळे गावात शांतता आणि सुरळीत वातावरण कायम राहिले आहे.
या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करत विशेष प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशस्तीपत्रातही त्यांची सेवा महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गौरव समारंभप्रसंगी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते, आणि अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय युवराज निकम यांनी उपस्थित राहून गोविंदा पाटील यांच्या सेवेला शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे संपूर्ण जैतपीर गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट