इंजी. गिरीश पाटील यांची अमळनेर तालुका सहकारी संघासाठी मतदान प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – अंमळगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विशेष सभा चेअरमन रावसाहेब देविदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत १३ पैकी १२ संचालक उपस्थित होते. सर्व संचालकांनी एकमताने इंजी. गिरीश सोनजी पाटील यांची अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून निवड केली.

इंजी. गिरीश पाटील हे सध्या अंमळगांवचे लोकनियुक्त सरपंच आहेत. अंमळगांव वि.का.सह. सोसायटी ही तालुक्यातील एक प्रमुख संस्था असून अंमळगांव, खेडी सिम, खेडी खुर्द, मेहरगाव, दोधवद व हिंगोणा या गावांचा तिच्यात समावेश आहे.
सभेस उपस्थित मान्यवरांमध्ये सोसायटीचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, संचालक डॉ. पंकज चौधरी, राजेंद्र पाटील, संजय चौधरी, संजय पाटील, सुभाष पाटील, हिंमत पारधी, ज्ञानेश्वर शिंदे, प्रभावती पाटील, सुनीता पाटील, तसेच ग्रा.पं. उपसरपंच जयेश कोळी, जयराम चौधरी, निखिल महाले, उल्हास पाटील, संजय धोबी, पिंटू पारधी, नाना कुंभार, दीपक पाटील, नरेंद्र चौधरी, गोविंदा चावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकिशोर व्यंकट पाटील यांचा समावेश होता.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट