महसूल सप्ताहानिमित्त पिंपळे खुर्द शिवारातील पाणंद रस्त्यांवर वृक्षारोपण.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – महसूल सप्ताहाचे औचित्य साधत पिंपळे खुर्द शिवारातील पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण 110 झाडांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी अमळनेर तहसीलदार श्री. रुपेश कुमार खुराणा, ऑल क्लर्क अनिल परदेशी, मंडळ अधिकारी विठ्ठल पाटील, वावडे मंडळातील महसूल अधिकारी पुरुषोत्तम पाटील, तलाठी जानवी जाधव, कोतवाल, तसेच पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामसेवक के. के. लंकेश, धरती माता शेतकरी महिला गटाच्या सदस्या, बालिका स्नेही पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील राजेंद्र पाटील आणि शेतकरी दिनेश पाटील यांची उपस्थिती लाभली.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा आणि शिवार सुंदर ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट