मध्यान्ह भोजनाचे फोटो दररोज पाठवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा! मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद सीईओ मीनल करनवाल यांचे स्पष्ट आदेश..

आबिद शेख/अमळनेर

जिल्हा परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील १८१८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर आता थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

शाळांमध्ये ठरलेल्या प्रोटोकॉल आणि मेनूनुसारच अन्न देण्यात येते की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी सर्व शाळांमधून दररोज भोजनाचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयानुसार, प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दररोज मध्यान्ह भोजनाचे प्रत्यक्ष फोटो काढून संबंधित अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड करणे अनिवार्य केले आहे.
फोटो न पाठवणाऱ्या मुख्याध्यापकांवर होणार कारवाई
सीईओ मीनल करनवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फोटो दररोज न पाठविणाऱ्या मुख्याध्यापकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. “या उपक्रमाच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन वितरणात पारदर्शकता, शिस्त आणि गुणवत्तेची खातरजमा होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पोषण आहार अधीक्षक यांनी ग्रुपवर आलेल्या मध्यान्ह भोजनाच्या छायाचित्रांचे मोजणी करून रेकॉर्ड ठेवायचे आहे. त्या सोबतच मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारे पदार्थ दिसतील अशा पद्धतीनेच छायाचित्र काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे शाळांमधील अन्न वितरणाची गुणवत्ता, वेळेवर उपलब्धता व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट