प्रती,

म. मुख्याधिकारी साहेब,

अमळनेर नगरपरिषद

यांचे सेवेशी

दि. ०४/०८/२०२५

विषय :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातील ताडी दुकान, आमलेट पाव दुकाने व इतर

अतिक्रमण काढणे बाबत

महोदय,

आम्ही खालील सह्या करणारे तमाम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व आंबेडकरी समाज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे सुजाण नागरिक विनंती निवेदन सादर करतो की,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पूर्णकृती पुतळा आपल्या अमळनेर शहरात असून तमाम आंबेडकरी जनता व त्यांच्यावर प्रेम करणारे नागरिकांसाठी ती भूषणावह बाब आहे.

परंतु आजच्या घडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व ठिकाणी अतिक्रमणाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्या ठिकाणी ताडी दुकान, आमलेट पावची दुकान, उघड्यावर तळणारी मटण विक्रीची दुकाने यांनी हा परिसर पूर्णपणे अतिक्रमानाने व्यापलेला आहे. तसेच पुतळ्याच्या मागील भागात पूर्णपणे भंगार व्यवसायिकांनी १००% रस्ता भंगार दुकानांसाठी अतिक्रमित म्हणून वापरात घेतलेला आहे. त्यामुळे पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सदरच्या भागातील सर्व अतिक्रमित दुकाने तातडीने काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चौक अतिक्रमण मुक्त करावा अशी आपणास नम्र विनंती.

असे न घडल्यास तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल व याबाबत होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती.

आपले विश्वासू

प्रत माहितीसाठी संविनय सादर.

म. पोलीस निरीक्षक साहेब

अमळनेर पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!