आंबेडकर चौकातील अतिक्रमणाबाबत संतप्त नागरिकांचे निवेदन – अतिक्रमण न काढल्यास आंदोलनाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ ताडी दुकान, आमलेट पाव व मटण विक्रीसह विविध प्रकारच्या अतिक्रमणाने व्यापलेल्या परिसराबाबत सुजाण नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व प्रेम करणाऱ्या नागरीकांनी आज अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. पुतळ्याच्या मागील भागात भंगार व्यावसायिकांनी संपूर्ण रस्ता अतिक्रमित केल्याचेही नमूद केले आहे. या अतिक्रमणामुळे परिसराचे पावित्र्य डागाळले जात असून, ते त्वरीत हटवण्याची गरज असल्याचा नागरिकांचा ठाम आग्रह आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर प्रशासनाने या अतिक्रमणावर तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरेल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांसाठी प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक, अमळनेर यांनाही सादर करण्यात आली आहे
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट