रोटरी क्लब अमळनेरला “सन्मान 2024-25” कार्यक्रमात 9 पुरस्कारांचा बहुमान..

0

आबिद शेख/ अमळनेर
अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या “सन्मान 2024-25” या रोटरी वर्ष 2024-25 साठी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात रोटरी क्लब अमळनेरला एकूण 9 विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब अमळनेरने रोटरी वर्ष 2024-25 मध्ये समाजोपयोगी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी डिस्ट्रिक्टच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. चंद्रपूर ते नाशिकपर्यंतच्या जवळपास 100 क्लब्समधील 500 ते 600 रोटरी सभासदांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या वर्षी क्लबच्या स्थापनेच्या 69 व्या वर्षात विविध उपक्रम, समाजोपयोगी प्रकल्प, पर्यावरण संवर्धन, युवकांसाठी कार्य आणि जनजागृती अशा क्षेत्रांत केलेल्या कार्यामुळे क्लबचे नाव जनमानसात अधोरेखित झाले आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. राजिंदरसिंगजी खुराणा आणि त्यांच्या टीमने खालील 9 पुरस्कार देऊन रोटरी क्लब अमळनेरच्या कार्याची पावती दिली:
प्राप्त पुरस्कार:


  1. Consumer Awareness Guidance
  2. Best Work Done During Natural Calamities
  3. Best Service to Youth
  4. Best Public Relation        
  5. Best Public Relation
  6. Project under Environmental Development – Preserve Planet Earth
  7. Appreciation Award for District Public Image Seminar
  8. Appreciation Award to Assistant Governor Rtn. Abhijeet Bhandarkar
  9. Club Excellence Award
  10. Diamond Citation of Excellence to Rtn. Taha Bookwala

या गौरवाबद्दल रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला म्हणाले की, “हे यश सर्व सदस्यांच्या एकजुटीने व मेहनतीने मिळाले आहे. हे सर्व श्रेय आमच्या कार्यरत आणि समर्पित मेंबर्सनाच जाते.”
ए.जी. रो. अभिजीत सुभाष भांडारकर यांनी सांगितले की, “या अवॉर्ड्समुळे संपूर्ण रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये अमळनेर क्लबचा नावलौकिक वाढला आहे. तसेच अमळनेर शहरात देखील क्लबच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.”

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!