मांडळ येथे घरासमोरून दुचाकी चोरी; मारवड पोलिसांत गुन्हा दाखल..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर– अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून दुचाकी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फिर्यादी अक्षय अशोक शिरसाठ (रा. मांडळ) हे फोटोग्राफी व्यवसाय करतात. त्यांनी प्रवासासाठी त्यांचा मित्र बादल सुरेश थोरात (रा. मूडी प्र. डांभुर्णी) यांची अंदाजे ६० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (क्रमांक एमएच १९ ईएन ९९४२) वापरासाठी घेतली होती.
३० जुलै रोजी रात्री १० वाजता त्यांनी सदर दुचाकी आपल्या घराच्या अंगणात लावली होती. मात्र, ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गाडी मालकाला माहिती दिली व परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकी कुठेही आढळून आली नाही.
अखेर त्यांनी मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश पाटील करत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/. -भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट