मुफ्ती हारून नदवी यांचा वीआयपी फाउंडेशनतर्फे सन्मान..

24 प्राईम न्यूज 5 Aug 2025


जळगाव शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मा. मुफ्ती हारून नदवी यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस (महासचिव) पदावर नियुक्ती करण्यात आली. या महत्त्वपूर्ण नियुक्तीनंतर त्यांचा वीआयपी फाउंडेशन, जळगाव तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

सत्कारासाठी फाउंडेशनचे प्रतिनिधी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी साजिद शहा, रिजवान शेख, शोएब मनियार, राहिल शहा, जुनैद खान आणि पत्रकार फैजान शेख यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन मुफ्ती साहेबांचा सन्मान करण्यात आला.
फाउंडेशनच्या वतीने त्यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून त्यांच्या नेत्यत्त्वाखाली समाजाच्या प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट