अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भरती प्रक्रियेला स्थगिती..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भरती धोरण निश्चित होईपर्यंत सर्व नवीन भरती व परंपरागत नियुक्त्यांना स्थगिती दिल्यामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मंजूर झालेली भरती प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडून १ ऑगस्ट २०२५ रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार शिपाई, पहारेकरी, माळी, निरीक्षक, सुपरवायझर व कनिष्ठ लिपिक अशा एकूण १२ पदांसाठी पूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र, शासनाच्या १९ मे २०२५ रोजीच्या आदेशानुसार राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील भरती धोरण निश्चित होईपर्यंत भरतीस परवानगी देऊ नये, असे निर्देश मिळाल्याने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट