माजी सैनिक मधुकर पाटील यांच्या स्वखर्चातून अमळगावमध्ये सार्वजनिक वाचनालय सुरू..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – तालुक्यातील अमळगाव येथे गावातील एअर फोर्सचे माजी सैनिक मधुकर यशवंत पाटील यांनी स्वखर्चातून सहा दैनिक वर्तमानपत्रांसह सार्वजनिक वाचनालय सुरू केले.
अमळगावचे लोकनियुक्त सरपंच इंजि. गिरीश सोनजी पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच जयेश कोळी, निखिल महाले, संजय धोबी, नाना कुंभार, राजेंद्र पाटील, विनय पारधी, गोविंदा चावरे, नरेंद्र चौधरी, गजानन पाटील, विश्वास बोरसे, गजानन चौधरी, सतीश पाटील, संजय पाटील, पांडुरंग पाटील, बापू चौधरी, भगवान पाटील, दिलीप पाटील, बन्सीलाल पाटील, गोरख धोबी, नाना वडर तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाचे गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले. मधुकर पाटील यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये वाचनाची सवय रुजण्यास आणि ज्ञानवृद्धीस चालना मिळणार आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट