मंगळ जन्मोत्सव भव्यतेने साजरा करण्यासाठी नियोजन बैठक..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात २ सप्टेंबर रोजी होणारा श्री मंगळ जन्मोत्सव यंदा अभूतपूर्व स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या महासोहळ्याच्या नियोजनाबाबत १० ऑगस्ट रोजी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत एकूणच आयोजन आणि नियोजनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा होऊन उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात आल्या.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी २९ व ३१ ऑगस्ट तसेच २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तीन दिवसांच्या भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. यामध्ये मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेशद्वार, अभिषेक व महाप्रसाद बुकिंग काऊंटर, चौकशी व मदत कक्ष, चहा-कॉफी-पाणी स्टॉल, स्थायी-अस्थायी स्वच्छतागृहे, वैद्यकीय कक्ष, चारचाकी व दुचाकी पार्किंग व्यवस्था, व्हिल चेअर सुविधा, मोबाइल नेटवर्कसाठी स्वतंत्र टॉवर, तसेच भाविकांसाठी वॉटरप्रुफ पेंडॉल यांचा समावेश आहे.
चोपडा रोडवरील शासकीय वसतीगृहाजवळ स्वतंत्र प्रवेशद्वार, चौकशी कक्ष, सुरक्षा व्यवस्था, ऑनलाइन-डिजिटल-सीसीटीव्ही कक्ष, तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला एकाचवेळी सुमारे २५ हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल, यासाठीची भव्य व्यवस्था करण्यात येणार आहे.
बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, जयश्री साबे, विनोद कदम, प्रकाश मेखा, आशा महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट