अल्पवयीन मुलीवरील अश्लील कृत्यास आरोपीस 4 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर –अल्पवयीन 7 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याबद्दल अशोक देवराम पाटील (वय 58, रा. वाळकी, ता. चोपडा) यास मा. न्यायालयाने 4 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.न. 207/2023, स्पेशल केस नं. 02/2024 अंतर्गत भा.द.वि. कलम 354, 354(अ), पोक्सो अधिनियम 2012 चे कलम 8 व 12 तसेच अ.जा.अ.ज. कायद्याच्या कलमानुसार हा खटला दाखल करण्यात आला होता.
घटनेप्रमाणे, पीडितेचे पालक उसतोडीच्या कामासाठी शेतावर गेलेले असताना आरोपीने गोड बोलून पीडितेला टीव्ही दाखविण्याचा बहाणा केला. घरात नेऊन स्वतःची पॅन्ट काढून पीडितेला मांडीवर बसवून अश्लील कृत्य केले. पीडिता रडत बाहेर पळाल्यानंतर तिने ही घटना मोठ्या बहिणीस सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सदर खटल्याची सुनावणी मा. तदर्थ व अति. जिल्हा न्यायाधीश-1 सौ. सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल मंगरुळकर यांनी एकूण 7 साक्षीदार तपासले. त्यातील पीडिता, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शींच्या साक्षांवरून आरोपी दोषी ठरला.
न्यायालयाने आरोपीस पोक्सो कलम 8 अंतर्गत 3 वर्षे सश्रम कारावास व 2000 रुपये दंड (दंड न भरल्यास 2 महिने कैद) तसेच कलम 12 अंतर्गत 1 वर्ष कारावास व 1000 रुपये दंड ठोठावला. अन्य कलमांतून आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आला.
या खटल्यात पैरवी अधिकारी पी.एस.आय. उदयसिंग सांळुके, पो.कॉ. केसवॉच राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे (अमळनेर), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर), पो.हे.कॉ. भरत इशी (मारवड) व पो.कॉ. सतीष भोई (अडावद) यांनी मोलाचे सहकार्य केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट