राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेत जळगावची विजयी सलामीनांदेडचा २-० ने पराभव..

24 प्राईम न्यूज 12 Aug 2025

जळगांव – राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने दमदार सुरुवात केली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात जळगावने नांदेड जिल्ह्यावर २-० असा विजय मिळवला.
जळगाव संघाचे नेतृत्व कर्णधार अर्शिया तडवी करत असून या सामन्यात त्यांनी आणि चैताली सोनवणे यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला विजयी सलामी दिली.
या उल्लेखनीय विजयाबद्दल जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे आश्रयदाते अशोक जैन, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष जफर शेख व इम्तियाज शेख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी दूरध्वनीद्वारे खेळाडूंचे अभिनंदन केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट