“१७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र… शालेय आठवणींचा हृदयस्पर्शी स्नेहमेळावा”

आबिद शेख/अमळनेर

– मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील सन २००७-०८ च्या इयत्ता दहावीचे विद्यार्थी तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शाळेच्या पायऱ्या चढल्या.
विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वर्गात प्रवेश करत वर्गशिक्षक संजय पाटील यांच्याकडून छडी घेण्याचा प्रतीकात्मक क्षण अनुभवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रुती पाटील होत्या. प्रमुख अतिथींचा सत्कार करून विद्यार्थ्यांनी आपापल्या आयुष्यातील सुखदुःखाच्या आठवणी, अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण केली.
शाळेतील मैत्रीचे बंध अधिक घट्ट करत, भविष्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी शिक्षक संजय पाटील, प्रभुदास पाटील यांच्यासह शीतल पाटील, सुवर्णा पाटील, भूषण खैरनार, सोनी धनगर, प्रियंका पाटील, अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, सीमा मोरे, सीमा पाटील, राहुल पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, सुदर्शन पवार, खुशाल पाटील यांची उपस्थिती लाभली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट