अंगारकी निमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भक्तांचा महासागर; शिस्तबद्ध व्यवस्थेचे कौतुक..

आबिद शेख/अमळनेर
श्रावणातील पवित्र अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात देशभरातून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. मंगळवारी आलेली संकष्ट चतुर्थी ‘अंगारकी’ म्हणून ओळखली जाते आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. यंदाचा अंगारकी योग १२ ऑगस्ट रोजी आल्याने या पर्वाचे विशेष धार्मिक महत्त्व होते.

भाविकांच्या श्रद्धेनुसार, या दिवशी गणपतीची आराधना व उपवास केल्यास वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते. पहाटे ५ वाजता धुळ्याचे अनिल रामेश्वर अग्रवाल यांनी श्री मंगळग्रहाच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करून धार्मिक विधींचा प्रारंभ केला.
अंगारकीच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात, अशी धारणा असल्याने, अनेकांनी या दिवशी व्रत, उपवास, अभिषेक व शांती पूजा करून पुण्यसंचय केला.
भाविकांची प्रचंड गर्दी होईल, याचा अंदाज मंगळग्रह सेवा संस्थेला आधीच होता. त्यामुळे योग्य नियोजन करून सर्व भाविकांसाठी सोयीसुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, महाप्रसाद, दर्शन व्यवस्था, तसेच अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थाही लावण्यात आली होती. यामुळे कोणतीही अडचण, गोंधळ किंवा अस्वच्छता झाली नाही.
सायंकाळपर्यंत हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला. श्रद्धा, भक्ती आणि सुव्यवस्थेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने सर्वत्र समाधान आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट