बेटावद खुर्द येथील सामूहिक मारहाणीचा एकता संघटनेचा तीव्र निषेध; आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी..

24 प्राईम न्यूज 13 आगी025

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय तरुण सुलेमान रहीम खान पठाण याच्यावर झालेल्या अमानुष सामूहिक मारहाणीच्या घटनेचा जळगाव जिल्हा एकता संघटनेने तीव्र निषेध केला असून, आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एकता संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन १२ ऑगस्ट रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना अशोक लाड वंजारी यांच्या हस्ते व अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना मतीन पटेल यांच्या हस्ते सादर करण्यात आले.
एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- घटनेची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी एस.आय.टी.मार्फत करण्यात यावी.
- दोषींवर तात्काळ कडक कारवाई करून भारतीय न्याय संहितेनुसार ९० दिवसांत चार्जशीट दाखल करण्यात यावी.
- पीडित कुटुंबास किमान २५ लाख रुपये आर्थिक मदत व एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी.
- मानवाधिकार आयोग व अल्पसंख्याक आयोग यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.
- गावात पोलिस बंदोबस्त वाढवून धार्मिक सलोखा राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर दोषींवर तातडीने कारवाई न झाली आणि पीडित कुटुंबाला न्याय न मिळाला, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनाची प्रत अल्पसंख्याक आयोग, मानवाधिकार आयोग तसेच मंत्री ना. गिरीश महाजन यांना प्रशासनामार्फत व थेट पाठवण्यात आली आहे.
अशोक लाड वंजारी, फारुक शेख, मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान, हाफिज इमरान काकर, जावेद मुल्लाजी (जामनेर), आसिफ इस्माईल, रज्जाक पटेल, कासिम उमर, नजमोद्दीन शेख, आरिफ देशमुख, युसुफ खान तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट