खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीवर वाद. – अध्यक्षांवर घटनाबाह्य निर्णयाचे आरोप..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर (नोंदणी क्रमांक एफ/२२) या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या त्रिवार्षिक निवडणुकीबाबत वाद निर्माण झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र शांतीलाल झाबक यांनी १४ ऑगस्ट २०२५ रोजी यांना पत्र बजावून निवडणूक घेण्याचे आदेश दिले.
यानंतर दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे चिटणीस यांना संबंधित पत्र प्राप्त झाले. मात्र, त्यावर सविस्तर चर्चा न होता “मी उद्या घेईन” असे सांगण्यात आले. याबाबत अध्यक्षांना योग्य ती माहिती देण्यात आली होती. तरीही अध्यक्षांनी १६ ऑगस्ट रोजी पुन्हा पत्र देऊन १८ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेच्या शेकडो सभासदांना कार्यालयात बोलावण्याचे सूचित केले.
संस्थेतील काही सदस्यांनी आरोप केला आहे की, अध्यक्ष घटनाबाह्य पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवडणूक गुपचूप रीत्या घेण्याच्या प्रयत्नात आहेत. निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या स्वतंत्र घटना व नियमावलीनुसारच होणे आवश्यक असून, अध्यक्षांनी मनमानी करून घेतलेला कोणताही निर्णय किंवा कार्यक्रम हा कार्यकारी मंडळ व सभासदांवर बंधनकारक राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, अध्यक्षांनी केलेल्या घोषणा या त्यांचे वैयक्तिक मत असून, त्यातून कार्यकारी मंडळाचा त्याग होत नाही. तसेच सभासदांची दिशाभूल किंवा फसवणूक होऊ नये या हेतूने हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट