अमळनेरात तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा विशेष उपक्रम..

0

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे कॅमेरा पूजन व वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम आज (१९ ऑगस्ट) सकाळी १० वाजता पत्रकार भवन येथे पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत यांनी भूषविले. यावेळी जेष्ठ पत्रकार संजय पाटील, जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे व मुक्तार अली सय्यद यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवान वारुळे यांच्या हस्ते पत्रकार भवन परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

अध्यक्ष चेतन राजपूत म्हणाले,
“फोटोग्राफी ही केवळ छायाचित्र घेण्याची कला नाही तर समाजाचा आरसा आहे. पत्रकार आणि फोटोग्राफर बांधव हे नेहमीच खांद्याला खांदा लावून कार्य करतात. फोटोग्राफर बांधवांना जी काही मदत लागेल, तेव्हा आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू. असोसिएशनने सामाजिक जाणीव ठेवून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला, हे कौतुकास्पद आहे.”

जेष्ठ पत्रकार संजय पाटील यांनी सांगितले,
“कॅमेऱ्यातून टिपलेला प्रत्येक क्षण हा इतिहासाचा दस्तऐवज असतो. छायाचित्रकार समाजातील अनेक घटनांना आवाज देतात. त्यांच्या कार्याचे महत्त्व अमूल्य आहे.”

तर जेष्ठ फोटोग्राफर भगवान वारुळे म्हणाले,
“छायाचित्रण ही माझ्यासाठी साधना आहे. आज आपण कॅमेऱ्याची पूजा करून त्याचे महत्व अधोरेखित केले. वृक्ष लागवडीमुळे निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक घट्ट झाले.”

या कार्यक्रमास पत्रकार जितेंद्र ठाकूर, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, महेंद्र रामोशे, डॉ. विलास पाटील, मुन्ना शेख, विजय पाटील यांच्यासह तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव दिपक बारी, खजिनदार मनोज चित्ते तसेच असंख्य फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन महेंद्र पाटील यांनी मानले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76600/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!