राजवड गावात सलग दोन दिवस ढगफुटी; पिकांचे मोठे नुकसान..

0

आबिद शेख/ अमळनेर


आबिद शेख/अमळनेर


राजवड (आदर्शगाव), ता. पारोळा, जिल्हा जळगाव येथे सलग दोन दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.

दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान तब्बल 86.3 मिमी पाऊस कोसळला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्ट रोजी पहाटे 1 ते 2.30 या वेळेत आणखी 127 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टी/ढगफुटीमुळे गावातील तसेच परिसरातील सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वहात आले.

पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने गावात व शेतशिवारात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून वाहून गेल्या असून उभ्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या समोर उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76600/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!