अडचणी थांबवण्यासाठी नसतात, पुढे जाण्यासाठी असतात – केशव भांगरे

24 प्राईम न्यूज 20 Aug 2025
अकोले तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेच्या श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, मवेशी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध दिव्यांग सहसी गिर्यारोहक केशव भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भांगरे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.” त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, तेलंगणा बुक रेकॉर्डमध्ये नोंद घेतलेल्या यशस्वी गड-किल्ल्यांच्या भटकंतीचा अनुभवही विद्यार्थ्यांशी शेअर केला.
याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, ज्येष्ठ नागरिक, तसेच भांगरे सर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुषा काळे मॅडम यांनी केले.
या प्रसंगी मच्छिंद्र देशमुख सर, श्रीमती आभाळे मॅडम, कल्पना शिंदे मॅडम यांचीही उपस्थिती होती.