गणेशोत्सव उत्साहात साजरा करा, पण नियमांचे पालन करा.. – पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे नागरिकांना आवाहन

24 प्राईम न्यूज 28 Aug 2025

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला तरी पारंपारिक पद्धतीने, शांततेत व नियमांचे पालन करून तो साजरा करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांनी पुढील सूचना दिल्या आहेत : पारंपारिक वाद्यांचा वापर करा; डीजे, लेझर लाईट टाळा. केमिकलयुक्त गुलालाचा वापर करू नका सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील जिल्ह्यातून तसेच जळगाव जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आलेले आहेत.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि गणेशोत्सव आनंदात, सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहनही डॉ. रेड्डी यांनी केले.