लायन्स क्लब तर्फे अमळनेरात आज एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथे एचपीव्ही (गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक) लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये अमळनेर शहर व परिसरातील किशोरवयीन मुलींना मोफत एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. हा उपक्रम समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी ही लस उपयुक्त आहे.
लायन्स क्लब ऑफ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील व कोषाध्यक्ष नितीन विंचूरकर यांनी समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिकाधिक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 102800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 94500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 78100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट