पातोंडा ग्रामसभेत महिलांची लक्षणीय उपस्थिती; विकासकामांवर चर्चा..

0


आबिद शेख/अमळनेर
पातोंडा ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होय. प्रथमच ३० ते ४० महिलांनी हजेरी लावून दैनंदिन अडचणी ठळकपणे मांडल्या. या उल्लेखनीय सहभागाचे ग्रामपंचायतीमार्फत विशेष कौतुक करण्यात आले.

ग्रामसभेपूर्वी मुरलीधर बिरारी यांनी महिलांना संविधानाने दिलेले अधिकार, ग्रामसभेचे महत्त्व आणि स्वतःच्या समस्या मांडण्याचा हक्क याविषयी मार्गदर्शन केले होते. या जागृतीमुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला व त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

ग्रामसभेत महिलांनी गटारींची दुरवस्था, सांडपाण्यामुळे रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, सार्वजनिक शौचालयांची निकृष्ट स्थिती, उकिरडे व कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि अपुरा पाणीपुरवठा या गंभीर समस्या मांडल्या. आरोग्य व स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या या मुद्द्यांवर ग्रामविकास अधिकारी बी. वाय. पाटील यांनी लवकरच उपाययोजना सुरू करण्याचे आश्वासन दिले.

पाटील यांनी गटारींची स्वच्छता-दुरुस्ती, सार्वजनिक शौचालयांचे दुरुस्तीकरण, डास नियंत्रणासाठी धूरफवारणी, रस्त्यांची डागडुजी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. तसेच ग्रामसमृद्धी योजनेत पातोंड्याचा समावेश व मनरेगा अंतर्गत रोजगारनिर्मितीबाबत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामसभेला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांपैकी सरपंच मनीषा मोरे, भरत बिरारी, नितीन पारधी, ज्ञानेश्वर सोनवणे आणि वैशाली पवार हे उपस्थित होते. तर उपसरपंच दिलीप बिरारी, कल्पना पवार, संदीपराव पवार, सोपान लोहार, प्रतिभा शिंदे, शीतल पाटील, ज्योती संदानशिव आणि रेखा पाटील हे आठ सदस्य गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व कारवाईची मागणी केली.

ग्रामस्थ घनश्याम पाटील, मुरलीधर बिरारी, प्रविण पवार, महेश धुमाळ, दाजभाऊ पारधी यांनी विविध प्रश्नांवर ग्रामविकास अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. महिलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली उपस्थिती व समस्यांची ठळक मांडणी यामुळे पातोंडा ग्रामसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून महिलांचा असा सक्रिय सहभाग भविष्यातील ग्रामविकास प्रक्रियेला नवे बळ देणारा ठरेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!