कालपासूनच्या मुसळधार पावसाने ग्रामीण व शहरी भागात हाहाकार. वासरे गावात भिल्ल वस्ती पाण्याखाली, मोठे नुकसान.

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण व शहरी भागाला झोडपून काढले. वासरे गावातील भिल्ल वस्ती पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ग्रामीण भागातील स्थिती पूर्जनीसारखी झाली होती.
कळमसरे, निंब व शहापूर येथे पाण्यात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले. त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात तात्पुरती निवासव्यवस्था करण्यात आली आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील अडकलेल्या लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यांना समाजमंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली
प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून नागरिकांना दिलासा दिला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट