“सरकार इंग्रजांपेक्षाही बेक्कार वागतंय” – मनोज जरांगे यांचा सरकारवर घणाघात..

0

24 प्राईम न्यूज 30 Aug 2025


मुंबई मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीहून निघालेलं मराठा वादळ शुक्रवारी अखेर मुंबईला धडकले. आझाद मैदानावर पोहोचताच मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली. “मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी जाहीर केला.

पत्रकार परिषदेत जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटलं –
“सरकारने शौचालये कुलुपबंद केली, पाण्याची समस्या तीच आहे. जेवण-चहाची दुकानं बंद करून आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही तर इंग्रजांपेक्षाही बेक्कार वागताय.”

सरकारकडून एक-एक दिवस परवानगी देण्याच्या खेळीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हे भंगार खेळ करण्यापेक्षा थेट मराठ्यांना आरक्षण द्या. गरीब मराठ्यांचं मनं जिंका; ते मरेपर्यंत विसरणार नाहीत,” असा सल्ला त्यांनी दिला.

जरांगे म्हणाले की, आंदोलन संपवायचं की सुरू ठेवायचं की मला गोळ्या झाडून मारायचं – हा निर्णय सरकारच्या हातात आहे. त्यांच्या आंदोलनामुळे अवघी मुंबई भगवीमय झाली असून वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!