प्रभाग रचनेवर रहिवाशांचा आक्षेप : जापान जिन परिसर पुन्हा प्रभाग ५ मध्ये सामील करण्याची मागणी..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :सन २०२५ मधील नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरून अमळनेर शहरातील जापान जिन परिसरातील रहिवाशांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी नगरपरिषदेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप रचनेनुसार जापान जिन परिसराला प्रभाग क्र. २ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, स्थानिकांनी या निर्णयाला विरोध दर्शवित प्रभाग ५ मध्येच हा परिसर ठेवावा अशी मागणी केली आहे हरकतदार रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

जापान जिन परिसर पूर्वीपासून प्रभाग ५ मध्ये होता. पण नव्या रचनेत तो प्रभाग २ मध्ये टाकल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय होणार आहे.

जापान जिन व प्रभाग २ यांच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक असल्यामुळे नैसर्गिकरित्या संपर्क शक्य नाही. नागरिकांना नगरसेवकांशी संपर्क साधण्यासाठी तब्बल ४ कि.मी. फिरून उड्डाण पुलाचा वापर करावा लागतो.

रेल्वे ट्रॅकखालून असलेला एकमेव बोगदा वाहन वाहतुकीस बंद असल्याने दळणवळण तुटते.

अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क होऊ शकत नाही, ज्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतील.

रहिवाशांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या तरतुदींचा दाखला देत म्हटले आहे की, प्रभाग फेररचना करताना भौगोलिक परिस्थिती व नागरिकांच्या हिताचा विचार करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जापान जिन परिसर पुन्हा प्रभाग ५ मध्येच जोडून देण्यात यावा, अशी त्यांनी नगरपरिषदेकडे मागणी केली आहे. या वेळी अझर अली शौकत अली, इकबाल कुरेशी,मोइनोदिन शेख, हस्नोद्दीन शेख, सईद बेलदार, जमील अ गफूर, सलीम शेख, इम्रान खान, फारूक शेख, आदी उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!