नादंडे येथे राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन.राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त आयोजन..

24 प्राईम न्यूज 30 Aug 2025
नांदेड महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने नांदेड जिल्हा सेपक टकरा असोसिएशन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड.यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त २५ वी सब ज्युनियर व २६ वी ज्युनियर सेपक टकरा स्पर्धा २०२५-२६ , जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे दि .२९ ऑगस्ट रोजी शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत बाबा बलविंदर सिंघजी (सचखंड गुरुद्वारा, नांदेड) होते
उद्घाटक:श्री. आ.बालाजीराव कल्याणकर (मा.आमदार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ)
प्रमुख पाहुणे :अविनाश कुमार ( पोलीस अधीक्षक, नांदेड)
सुशीलकुमार जाधव (अध्यक्ष नांदेड जिल्हा सेपक टकरा असो.) जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पाडमुखे, राज्य उपाध्यक्ष तथा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त हनुमंत लुंगे, प्रविण कुपटीकर, आयोजन समितीचे सचिव रवि बकवाड, राज्य स्पर्धा समन्वयक डॉ .विनय मुन, राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, लक्ष्मण फुलारी, जिल्हा सचिव इकबाल मिर्झा, आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य तील 72 संघातील खेळाडू, मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक, पंच, राज्य पदाधिकारी सर्वं 1150 सहभागी झाले.
ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.
मार्च पास महाराष्ट्र राज्यातील 72 संघांनी खेळाडूंनी प्रमुख पाहुण्या सलामी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण कुपटीकर (सचिव नांदेड जिल्हा सेपक टकस असो यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वतीने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूं चा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आ. कल्याणकर म्हणाले राज्य सेपक टकारा क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकारात खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून प्राविण्य प्राप्त करावे. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधिक्षक अविनाशकुमार म्हणाले खेळाडूंनी नियमित मैदानावर खेळावून तंदुरुस्त रहावे. आपले करीअर घडवावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्झा आसिफ यांनी केले.
आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी मानले .
याप्रसंगी जिल्हा सचिव रामचंद्र दत्तू, शेख चाँद, दिपक निकम, डॉ.परवेज खान, मनोज बनकर, विनय जाधव, चेतन पगवाड, सचिन शेळके, संदिप तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बालाजी शिर्षीकर, संजय बेत्तेवार, शुभम पाडदे ,दिलीप हनमते,दिलीप सुर्यवंशी, अनिकेत सरपाते, उपस्थित होते.
साखळी सामन्यात ज्युनिअर मुले संघात जळगाव, अमरावती, वर्धा, नांदेड, नागपूर,नाशिक विजयी घोडदौड.