दहिगाव यावल हत्याकांड : विशेष समितीमार्फत चौकशीची मागणी. एकता संघटनेसह विविध संघटना पुढे सरसावल्या

24 प्राईम न्यूज 31 Aug

यावल / दहिगाव :–
दहिगाव (ता. यावल) येथे इम्रान पटेल यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. या हत्याकांडातील आरोपी ज्ञानेश्वर गजानन पाटील व गजानन रवींद्र कोळी यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन आत्मसमर्पण केले.

एकता संघटना व विविध संघटनांचा पाठपुरावा
घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा एकता संघटना यावल येथे दाखल झाली. प्रतिनिधींनी रुग्णालय व पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. यावेळी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी फारुक शेख (जळगाव), कुर्बान शेख (फैजपूर), जावेद जनाब (मारुळ) व अँड. अलीम खान (यावल) यांनी थेट चर्चा केली. या वेळी पोलिस अधीक्षकांनी आरोपींवर कठोर कारवाई होईल आणि तपास जलद गतीने पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.
विशेष समितीमार्फत चौकशीची मागणी
हा खूनाचा प्रकार अत्यंत निर्गुण असून गंभीर स्वरूपाचा असल्याने तपास विशेष समितीमार्फत एका महिन्यात पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली. या मागणीत करीम सालार, फारुक शेख (एकता संघटना), नदीम मलिक (राष्ट्रवादी), कुरबान शेख (कौमी एकता), रहीम पटेल (हुफ्फाझ फाउंडेशन), मतीन पटेल (नोबल न्यूज), अनिस शाह (सामाजिक कार्यकर्ते), मौलाना कासिम नदवी (SDPI), कासिम उमर (अजित पवार गट), अयाजअली सैयद, खालिद बागवान, इरफान सालार, जिया बागवान, इम्रान शेख, हाजी युसुफ देशमुख आदींचा समावेश आहे.
अंत्ययात्रेत हजारोंची गर्दी
दहिगाव येथे इम्रान पटेल यांच्या अंत्ययात्रेत हिंदू-मुस्लिम बांधवांसह जळगाव शहरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिसरात शोककळा पसरली होती.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 105600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97150/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1240/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट