धार येथील मस्जिद रजाक चे इमाम उमराह यात्रेसाठी रवाना; मुस्लिम समाजातर्फे सत्कार.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुका (धार): धार येथील मस्जिद रजाक चे इमाम (धर्मगुरु) यांना गावातील मुस्लिम समाजाने एकत्रितपणे आपल्या खर्चाने उमराह यात्रेसाठी मक्का-मदीना येथे रवाना केले. या प्रसंगी समाजबांधवांकडून त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार व स्वागत करण्यात आला.

समाजातील मान्यवर तसेच नागरिकांनी एकत्र येऊन इमामांना उमराह यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनी मिळून केलेल्या या उपक्रमामुळे समाजातील ऐक्य आणि सहकारभावाचा उत्तम आदर्श दिसून आला गणेश पाटील संजय पाटील यशवंत पाटिल मिलींद पाटिल यांनी पण इमाम साहेब चा सत्कार केला.
धार गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रसंगाचे साक्षीदार झाले. इमामांना यात्रेसाठी शुभेच्छा देताना अनेकांनी त्यांच्याकडून गाव व समाजाच्या प्रगतीसाठी दुआ करण्याची विनंती केली. या वेळी V.N.मुजावर ,बाबू पेंटर ,हाजी नईम मुजावर, मुन्ना मुजावर ,असलम मुजावर ,निमन मुजावर ,अजीम भाई, शौकत भाई ,जाकीर शेख, अजीज शाह, सत्तार मुजावर, आदी उपस्थित होते
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 105600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97150/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1240/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट