श्री मंगळग्रह मंदिरात आज नवकुंडी महाविशेष शांतीयाग व कळसारोहण. ८१ यजमानांचा सहभाग; महामंडलेश्वर जनार्दन महाराजांच्या हस्ते कळसारोहण

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :श्री मंगळ जन्मोत्सव महामंगलप्रसंगी तीन दिवसीय महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात तीन दिवस विविध विशेष महापूजा आयोजित केल्या आहेत. त्यानुसार आज ३१ ऑगस्ट रोजी नवकुंडी महाविशेष शांतीयाग दोन सत्रात पार पडणार आहे. यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील ८१ यजमान सपत्नीक सहभागी होणार आहेत.
मंदिर प्रांगणातील माता भैरवी व श्री कालभैरव यांच्या विश्वातील एकमेव त्रिशुलात्मक मंदिराचा कळसारोहण सोहळा फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन महाराजांच्या शुभहस्ते संपन्न होईल. या वेळी विविध मान्यवर व भाविक दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
यंदा मंगळग्रह देवाच्या प्रभावाच्या वर्षात २७ वर्षांनंतर श्री मंगळ जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. २९ ऑगस्ट रोजी श्री महाभोमयाग भक्तिमय वातावरणात पार पडला. तर येत्या मंगळवार, २ सप्टेंबर रोजी श्री मंगळ देवाचा जन्मोत्सव महासोहळा आयोजित करण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
आजच्या यज्ञात सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रत्येकी ३६ यजमान अशा एकूण ७२ यजमानांच्या हस्ते नवकुंडी महाविशेष शांतीयाग होईल. तसेच कळसारोहणाच्या वैदिकुंडीय महापूजेत नऊ यजमान सहभागी होतील. पूर्णाहूतीनंतर सायंकाळी ६ वाजता महाआरती होऊन सर्व यज्ञांचा समारोप होईल.
भाविकांनी या दिव्य महासोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 105600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97150/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1240/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट