श्री मंगळ ग्रह जन्मोत्सव : लाखो भाविकांचा उत्साह, नियोजनबद्ध शिस्तीचे कौतुक..

आबिद शेख/ अमळनेर

श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याच्या निमित्ताने देवाचे दर्शन, पूजा, शांती अभिषेक प्रसादाचा लाभ घेण्याची लाखो भाविकांना दीर्घ काळापासून लागलेली आस २ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. गेल्या २९ व ३१ ऑगस्टच्या महाभोमयाग व नवकुंडी महाविशेष शांती यागानंतर अतिशय सूक्ष्म नियोजन व शिस्त पद्धतीने साजरा झालेला श्री मंगळग्रह देवाच्या चिरस्मरणीय जन्मोत्सवाचे लाखो भाविकांनी याची देही याची डोळा दर्शन घेतले. दिवसभरात चोरी, पाकीट मारी किंवा कोणताही गैरप्रकार घडला नाही. वाहनांचा धक्का लागणे, अपघात होणे किंवा वाहनांची अस्ताव्यस्तता असा कोणताही गैरप्रकार घडला नाही, हे विशेष…!
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षी मंगळ देवाचा जन्मोत्सव साजरा होतो. मात्र यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे व कृपेचे असल्याने श्री महामंगल जन्मोत्सव महासोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्याचे मंगळ संस्थेने ठरविले होते. त्यातून २९ व ३१ ऑगस्ट रोजी महाभोमयाग, कलशारोहण व नवकुंडी विशेष शांती याग झाला. २ सप्टेंबर रोजी परंपरेनुसार पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळ ग्रह देवाची उत्सव मूर्ती ठेवून प्रतिकात्मक स्वरूपात श्री मंगळ जन्मोत्सव साजरा झाला . या वेळी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, संजय महाले, डॉ. अभय गुजराथी, राजेंद्र भामरे, विजय वाघ, प्रशांत रामलिंगे, डॉ . महेंद्र ठाकरे,, विशाल गुप्ता, विष्णू शर्मा, वीरेन यादव आणि तिलोकचंद कोतवाल या मानकऱ्यांनी श्री मंगळ महाविशेष अभिषेक, श्री पंचामृत महाभिषेक, नूतन ध्वजारोहण, छत्रपती संभाजी नगर येथील केटरर्स उपाध्याय बंधूंनी ५६ भोगार्पण विधी केले. ध्वजाचे मानकरी मनोज पांडव यांनी सकाळी सहा वाजता कुटुंबासह येऊन नवे ध्वज आणले. सर्वांनी ध्वजाचे पूजन व स्वागत केले. वाजत गाजत ध्वज मंदिरापर्यंत आणण्यात आले. मंदिराच्या कळसावरील व प्रवेशद्वारावरील जुने ध्वज काढून तेथे नवीन ध्वज लावण्यात आले. मंदिरात सुरक्षा रक्षक असलेल्या माजी सैनिकांनी ध्वजास सलामी दिली.मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, प्रसाद भंडारी, शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, तुषार दीक्षित, जयेश पाठक, भूषण जोशी, धनंजय डागवाले, सारंग पाठक, व्यंकटेश कडवे, मनीष कुलकर्णी, अभिषेक भट यांनी पौरोहित्य केले.
जन्मसोहळ्यानंतर व सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. सायंकाळी जल्लोषात पालखी उत्सव झाला. दरम्यान केंद्रिय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासह हिरकणी कक्षाचे उद्धाटन केले. या प्रसंगी खासदार स्मिता वाघ, माझी जि. प. सदस्य जयश्री पाटील,भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षा धरती देवरे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आरएसएसचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब चौधरी, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे, मुलगा अविष्कार भुसे, सून लतिषा भुसे, नासिक विभागाच्या आयकर आयुक्त लीना श्रीवास्तव, छत्रपती संभाजीनगरचे जीएसटी सहआयुक्त अभिजित राऊत, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, चाळीसगाव उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पत्नी डॉ. मिश्रा, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, जळगाव जिल्हा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, धुळ्याचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, वीज वितरण कंपनीचे निलेश सोनगिरे, तोताराम नेमाडे ,जगदीश देवपुरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील लाखो भाविकांनी अभिषेक, शांती, महाप्रसाद, दर्शन आदींचा लाभ घेतला घेतला.
यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त , अनिल अहिरराव,जयश्री साबे डी. ए. सोनवणे ,आनंद महाले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर . जी.चव्हाण यांच्यासह मंगल सेवेकरी उज्वला शाह, सुनीता कुलकर्णी, प्रकाश मेखा ,विनोद कदम, बाळा पवार, विनोद अग्रवाल ,हरिओम अग्रवाल ,अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडे, प्रवीण पाटील, रणजीत शिंदे भोजुशेठ माहेश्वरी, चंद्रकांत महाजन, निलेश महाजन ,शरद सोनवणे, विवेक देशमुख, हेमंत पवार ,अनिल कदम, महेश कोठावदे ,राजू नांढा ,प्रशांत सिंघवी, डॉ. विजय पवार, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. पी . जी. पिंगळे बाळासाहेब पाटील चहावाले, पी. बी. पाटील खिलू ढाके, आशिष चौधरी, नरेश कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय पाटील, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, भोला टेलर , अभिषेक पाटील, प्रतीक पाटील,काँग्रेसचे मनोज पाटील, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, ॲड .सुरेश सोनवणे , डॉ.प्रशांत शिंदे, डॉ .अक्षय कुलकर्णी ,जयेश काटे, उमेश काटे, दिनेश पालवे गणेश भामरे व त्यांची पोलीस पाटील संघटना अमित पाटील, राजेश बिराडे, विलास बिराडे, विजय बिराडे , राहुल बहिरम राहुल जगतराव पाटील,विविध महिला मंडळ अनिरुद्ध बापूंची डिझास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक उमेश धनराळे, जयंतीलाल वानखेडे ,उमेश वाल्हे, विजय राजपूत, देवा लांडगे, ईश्वर अग्रवाल, ज्ञानेश्वर धनगर, खाटू श्याम परिवार मनसा बग्गा ,मंगल सेवेकरी, मंगल परिवार, लायन्स क्लब रोटरी क्लब व विविध सेवाभावी संस्था-संघटना, मंडळे, आदींसह मंदिराचे सेवेकरी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 107700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट