राज्य सेपक टकरॉ अजिंक्यपद स्पर्धेत जळगावचा उपविजेतेपदाचा मान..

24 प्राईम न्यूज 4 Sep 2025

नांदेड :महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे दिनांक २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या २५ व्या सब-ज्युनिअर व २६ व्या ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. टीम इव्हेंट व रेगू इव्हेंटमध्ये प्रभावी खेळ सादर करून जळगावच्या खेळाडूंनी रौप्य पदक आपल्या नावावर केले.
संघाचे नेतृत्व कर्णधार शेख फैजान रईस यांनी केले. मुख्य प्रशिक्षक मिर्झा आसीफ इकबाल, सहाय्यक प्रशिक्षक आमीर खान व फैजान शेख तसेच संघ व्यवस्थापक इमरान शेख, मोहसीन पिंजारी व दानिश खान यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
जळगाव संघाच्या या यशाबद्दल केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री ना. रक्षा खडसे, राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश सोनवणे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, मनपा आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर ढेरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अशोक नखाते यांनी संघाचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष हाजी एजाज गफ्फार मलीक, उपाध्यक्ष प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव इकबाल मिर्झा यांच्यासह प्रा. बाबू शेख, प्रा. नईम शेख, नाझीम खान, प्रा. वसीम मिर्झा, शेहबाज शेख यांनीही खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक केले.
ज्युनियर मुलांचा संघ :
शेख फैज़ान रईस (कर्णधार), सय्यद शिकेब, सय्यद ऊवेस, उमर ज़िया बागवान, बागवान मो. हम्माद, शेख रेहान, तंबोली मो. अदनान, फुरकान खान, खातीब रयान, अरफात बागवान, शेख तनवीर, शेख सोहेल, खान अफ्फान, रुद्राक्ष देठे, अनस शेख.
जळगावच्या मुलांनी केलेल्या या शानदार कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राज्यभर झळकले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 107700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट