जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व..

0

24 प्राईम न्यूज 4 Sep 2025

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी जळगाव व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ व ३ सप्टेंबर २५ रोजी बियाणी मिल्ट्री स्कूल, भुसावळ येथे जिल्हास्तरीय १४ व १९ हॉकी शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजयी व उप विजयी संघास बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या सौ आयुषी रौनक बियाणी,पियुष बियाणी, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव फारूक शेख, उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सदस्य आबिद सर व बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी एम पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

या स्पर्धांमध्ये १४ वर्ष, १९ वर्ष मुले व मुली यांचे एकूण १० संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षाखालील मुले

एम आय तेली स्कूल – विजयी. डॉ. उल्हास पाटील गोदावरी स्कूल, उपविजेता

१४ वर्षाखालील मुली
बियाणी पब्लिक स्कूल – विजयी
डॉ.उल्हास पाटील गोदावरी स्कूल- उपविजेता

१९ वर्षाखालील मुले
बियाणी ज्युनिअर कॉलेज, भुसावळ विजयी
बी झेड उर्दू हायस्कूल भुसावळ, उपविजेता

१९ वर्षाखालील मुली
बियाणी ज्युनिअर कॉलेज भुसावळ, विजयी
बियाणी मिलिटरी स्कूल, उपविजेता.

विजयी व उप विजयी संघातील खेळाडूंना हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे पदक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

पंच म्हणून अमन तेली व तौसिफ बेग यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक एच एन पाटील व युसुफ खान यांनी परिश्रम घेतले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 108500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!