पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू : पोलीस अंमलदारांना सुवर्णसंधी..

24 प्राईम न्यूज 5 Sep 2025

पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी २५ टक्के आरक्षणाअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसेच तरुण अंमलदारांसाठी अधिकारी होण्याचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पीएसआय पदासाठीची विभागीय परीक्षा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर बुधवारी शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
पूर्वी पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अंमलदारांना ही परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक पोलिसांना अधिकारी होण्याची संधी मिळत होती. मात्र, फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानंतर ही परीक्षा बंद करण्यात आली होती.
गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले की,
“विभागीय परीक्षा पुन्हा सुरू झाल्यामुळे अंमलदारांना अनेक वर्षे प्रतीक्षा न करता करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. कमी वयात पदोन्नती मिळाल्याने ते २०-२५ वर्षे पीएसआय पदावर कार्यरत राहू शकतील.”
या निर्णयामुळे हजारो पोलीस अंमलदारांचे स्वप्न साकार होणार असून, पोलिस सेवेत तरुणाईला अधिकारी होण्याची नवी संधी मिळणार आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 108500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 99800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट