साकळी, यावल, चिनावल व हिंगोणा घटनांवर एकता संघटना आक्रमक- अनुचित प्रकारांविरोधात एकता संघटनेचे पोलिस प्रशासनास निवेदन..

0

24 प्राईम न्यूज 6 Sep 2025

जळगाव, दि. ५ सप्टेंबर २०२५ :यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील फैजपूर विभागातील विविध गावांमध्ये काही मंडळांनी मुद्दामहून मशिदीजवळ वाद निर्माण करून सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचविला आहे. एकता संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक व फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली.

घडलेल्या प्रमुख घटना

साकळी व चीनावल (ता. यावल) तसेच हिंगोणा ता फैजपूर येथे विसर्जनावेळी काही समाज कंटाकांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला
त्या ठिकाणी पोलीस उपस्थित असूनही कारवाई झाली नाही.

या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाची प्रतिक्रिया

निवेदन स्वीकारताना फैजपूर पोलिस उप विभागीय अधिकारी अनिल बडगुजर साहेबांनी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले की, “आपण शांतता राखा, तुमच्यावर अन्याय होणार नाही. ज्यांनी चुकीचे वर्तन केले आहे त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल.”

तसेच फैजपूर पो स्टे चे प्रमुख ए पी आय मोताले साहेबांनीही तक्रारींची सखोल तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

एकता संघटनेच्या मागण्या :
१) सर्व घटनांमध्ये सहभागी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
२)जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांजवळ विसर्जनावेळी पोलीस बंदोबस्त अनिवार्य करावा.
३)जे पोलीस अधिकारी निष्क्रिय राहिले, त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करावी.
एकता संघटनेचे शांततेचे आवाहन

एकता संघटनेने प्रशासनाच्या आश्वासनाचे स्वागत केले असून, सर्व समाजबांधवांनी शांतता, बंधुता व सामाजिक सलोखा टिकवावा, असे आवाहन जळगाव चे मुफ्ती खालिद व फारुक शेख फैजपूर चे कलीम मेंबर व कुर्बान मेंबर तर हिंगोणा चे अशफाक तडवी,रफिक महमूद,याकूब खान,सईद शेख व हमीद तडवी केले आहे.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
जळगावचे मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफीज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, अनिस शहा, अनवर सिकलगार, एडवोकेट आवेश शेख, नजमुद्दीन शेख, कासिम उमर, फैजपूरचे कलीम मेंबर ,कुर्बान मेंबर, कामिल शेख, जफर शेख, अख्तर पैलवान, हिंगवण्याचे रफिक शेख ,अशपाक तडवी, इकबाल मणियार, याकूब खान, रुबाब तडवी, हमीद तडवी, शेख सईद, शेख भिकारी, शेख साबीर, मुस्तफा शेख, शेख नबी, शेख रशीद आदींचा समावेश होता
फोटो कॅप्शन
१) पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांना तिन्ही गावाची संयुक्त तक्रार अर्ज सादर करताना मुफ्ती खालीद, फारुक शेख , कुरबान मेंबर, कलीम मेंबर आधी दिसत आहे
२) पोलिस उप अधीक्षक बडगुजर यांना हिंगोणा बाबतची तक्रार देताना अशफाक तडवी व रफिक शेख दिसत आहे
३) फैजपूर पोलीस स्टेशनचे ए पीआय मोताळे यांना तक्रार सादर करताना शिष्टमंडळ
४) एपीआय मोताळे यांना
साकळीची तक्रार सादर करताना मौलाना कासिम नदवी ,कलीम मेंबर व ॲड.आवेश दिसत आहे
५) पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर उपस्थित शिष्टमंडळात समोर शांततेचे आवाहन करताना.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 109000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 100300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 82900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1285/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!